भारताचे अभिन्न अंग असल्याचे पाकिस्तान आणि अमेरिकेने मान्य केले आहे, असा दावा बेग यांनी केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये कधीही जनमत चाचणी घेतली जाऊ शकत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जम्मू-काश्मीरला स्वायत्तता द्यावी, अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे. याचा अर्थ जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी मान्य केले आहे, असे ते म्हणाले.
भारताच्या घटनेने मान्य केलेले अधिकार आणि हक्क जम्मू-काश्मीरला देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पीडीपीचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसैन बेग यांना पद्मभूषण जाहीर झाला असून, हा सन्मान माझ्या एकट्याचा नाही. जम्मू-काश्मीरच्या जनतेचा हा गौरव आहे, अशी प्रतिक्रिया बेग यांनी दिली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून बेग यांनी काम पाहिले आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यासोबत बेग यांनी पीडीपीची स्थापना केली होती. व्यवसायाने वकील असलेले बेग २०१४ मध्ये बारामुल्ला या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times