लोणावळा: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली असून भाजपची हक्काची व्होटबँक असलेल्या गुजराती मतदारांनाही आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या या प्रयत्नांची राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी खिल्ली उडवली आहे. ‘निवडणुकीच्या व्यतिरिक्तही शिवसेनेनं गुजराती समाजाशी सौहार्द ठेवायला हवा,’ असा खोचक टोला फडणवीस यांनी हाणला आहे.

वाचा:

लोणावळा येथे ते पत्रकारांशी बोलत होते. गुजराती समाजाशी जवळीक साधण्याच्या हेतूनं शिवसेनेनं काल जोगेश्वरी येथे गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला होता. ‘मुंबई मा जलेबी ना फापडा, ‘ अशी या कार्यक्रमाची टॅगलाइन होती. पत्रकारांनी याबाबत फडणवीसांना विचारलं असता, ‘गुजराती समाजाला निवडणुकीसाठी का होईना, जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करतेय याचा आनंद आहे. निवडणुकीच्या व्यतिरिक्तही त्यांनी गुजराती समाजाशी सौहार्द ठेवायला हवा. शेवटी तेही आपले नागरिक आहेत,’ असं फडणवीस म्हणाले.

वाचा:

‘एकीकडं अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना कडाडून विरोध करतेय आणि दुसरीकडं गुजराती समाजाला जवळ घेऊ म्हणतेय. अशा कार्यक्रमांनी कोणी जवळ येत नाही. कृतीतून लोक जवळ येतात,’ असं ते म्हणाले. ‘निवडणुका आल्यामुळं ही सगळी नौटंकी सुरू आहे. गुजराती भाषिकांचं सोडाच, निवडणुकीसाठी शिवसेनेनं हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे केलं गेलंय. ऊर्दू भाषेत शिवसेनेची कॅलेंडरही निघताहेत. निवडणुकीच्या निमित्तानं ही सगळी नौटंकी चाललेय. हे सगळं कशासाठी चाललंय हे लोकांनाही कळतं,’ असं ते म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here