म. टा. प्रतिनिधी, सांगलीः सांगली बसस्थानकावरून तासगावकडे निघालेल्या महिलेचे पर्समधील साडेसहा लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांने हातोहात लंपास केले. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विट्याकडे जाणा-या बसमध्ये बसत असताना चोरीचा प्रकार घडला. या चोरीप्रकरणी सुजाता दशरथ बंडगर (वय ४६, रा. वासुंबे, ता. तासगाव) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बसस्थानक परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुजाता बंडगर या तासगाव तालुक्यातील वासुंबे येथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. रविवारी त्या मुलासह इचलकरंजी येथे आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास पुन्हा त्या इचलकरंजीहून गावी परत जाण्यासाठी निघाल्या.

बंडगर यांनी पर्समध्ये कापडी पिशवीत त्यांचे सोन्याचे दागिने टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्या सांगली शहर बस स्थानकात पोहोचल्या. सांगलीहून विट्याकडे जाणा-या बसमध्ये बसताना चोरट्यांनी त्यांचे पिशवीतील केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here