वाचा:
सूर्यकांत महाडिक यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी (अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटलागांव, चेंबूर) मंगळवारी सकाळी ७ ते १० या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील काडवली (पाचघर वाडी) या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सांगण्यात आले.
वाचा:
सलग २० वर्षे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष
कामगारांच्या न्यायहक्कांसाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत यांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. शिवसेनेचे झुंजार नेते, कमांडर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात यांच्याकडे काही काळ या संघटनेची धुरा देण्यात आली होती. त्यानंतर सूर्यकांत महाडिक यांनीच गेली २० वर्षे या संघटनेचे नेतृत्व केले. महाडिक हे शिवसेनेचे उपनेते होते. नेहरूनगर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेने कामगारांसाठी अनेक यशस्वी लढे दिले. अनेक कंपन्यांमध्ये या संघटनेने वेतन करार घडवून आणत कामगारांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही या संघटनेचे जाळे पसरवण्यात महाडिक यांचे योगदान राहिले. त्यामुळेच महाडिक यांच्या निधनाने शिवसेनेने कामगार क्षेत्रातील आपला खंदा नेता गमावला, अशी भावना व्यक्त होत आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times