पूर्व लडाखमध्ये चीनने सुमारे १०, ००० सैनिक सीमेवरून मागे घेतले आहेत, अशी माहिती सरकारमधील उच्च सूत्रांनी ही माहिती दिलीय. चिनी सैनिक लडाखमध्ये भारतीय सीमेजवळ ज्या ठिकाणी प्रशिक्षण करतात ती जागा सध्या रिक्त आहे, असं
गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारताशी तणाव सुरू झाला होता तेव्हा चीनने सीमेवर ५०,००० सैनिक तैनात केले होते. तेव्हापासून हे चिनी सैनिक लडाखमधील एलएसी येथे तैनात होते. संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना चिनी सैनिक लडाखच्या डोंगराळ भागात तैनात होते.
भारतीय सीमेवरील सुमारे २०० किमीच्या परिघातून चिनी सैनिक मागे हटवण्यात आले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आणि निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे चीनने आपले सैनिक मागे घेतल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.
बर्फाच्या वाळवंटात सीमेवर भारतीय जवान तैनात
कडाक्याच्या थंडीमुळे चीनला आपले सैनिक मागे घेण्यास भाग पाडलं, पण त्याचवेळी आघाडीच्या चौक्यांवर भारतीय जवान सीमेचं रक्षण करत आहेत. शून्याहून कित्येक अंशांपेक्षा कमी तापमानातही भारतीय जवान चीनच्या सीमेवर लडाखमध्ये तैनात आहेत. चीनच्या कोणत्याही प्रकारच्या कुरापतीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय जवान सीमेवर तैनात आहेत.
सीडीएस जनरल रावत यांचा लडाख दौरा
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ( CDS) जनरल बिपीन रावत यांनी सोमवारी लडाखला भेट दिली. त्यांनी लडाखमध्ये भारतीय सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर रावत यांचा हा महत्त्वाचा दौरा मानला जातोय. याआधी रावत यांनी अरुणाचल प्रदेशातील सुबनसिरी खोऱ्यात तैनात असलेले भारतीय लष्कराचे जवान आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या तयारीची पाहणी केली. यासोबतच त्यांनी सीमेवर अरुण प्रदेशातील पूर्व भागात आणि आसाममध्ये आघाडीच्या चौक्यांवर तैनात असलेल्या लष्कराच्या ठिकाणांना भेट दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times