महेश गायकवाड । ठाणे:
ठाण्यातील (२३ ) या तरुणाची हत्या करून मृतदेह घाटात फेकल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून ही हत्या या तरुणाची आई, मोठा भाऊ आणि अन्य एक नातेवाईक अशा तिघांनी मिळून केल्याची बाब पोलिसांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या हत्येमागचे कारणही तितकेच धक्कादायक असून काहीच काम न करणारा सतीश पैशाची मागणी करत असे. पैसे न दिल्यास मारण्याची धमकी दिली होती. शिवाय तो त्रासही देत होता. याच त्रासाला कंटाळून आरोपींनी सतीशची हत्या केली. ( Latest News Update )

वाचा:

मूळचा नंदुरबारचा असलेला आणि सध्या ठाण्यातील चिरागनगर भागात राहणारा सतीश आगळे याची हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत बांधून कसारा घाटामध्ये दरीत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी ९ जानेवारी रोजी कसारा पोलीस ठाण्यात सतीशचा मोठा भाऊ शिवाजी याने दिलेल्या तक्रारीनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी लवकरात लवकर हत्येची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये सतीश याचा भाऊ शिवाजी आणि आई मायाबाई यांचे बोलणे तसेच वागण्याबाबत पोलिसांना संशय आला. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीअंती या हत्येचा उलगडा झाला. सतीशच्या त्रासाला कंटाळून ७ जानेवारीला पहाटे शिवाजी, मायाबाई आणि अमृत बिरारे या तिघांनी आपसात संगनमत करून घरातच सतीशची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत भरून कारने मृतदेह कसारा घाटात आणला आणि मृतदेह घाटात फेकून दिला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

वाचा:

फोन आल्याचा खोटा बनाव

तुमच्या मुलाचे कपडे आणि मुलगा कसारा घाटात आहे, असा सतीशच्या मोबाइलवरून मायाबाई यांना ९ जानेवारी रोजी सकाळी फोन आला होता. मात्र, हा केवळ बनाव असल्याची बाब चौकशीनंतर समोर आली. सतीश याचा अंत्यविधी करता यावा या उद्देशाने फोन आल्याचा खोटा बनाव केला होता. विशेष म्हणजे शिवाजी आणि मायाबाई हे दोघेही कसारा घाटामध्ये आले होते. येथील कठड्यावर सतीशचे असलेल्या कपड्याबाबत माहिती देखील त्यांनीच पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी धाव घेत पाहिले असता गोणीमध्ये सतीशचा मृतदेह आढळला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here