म. टा. प्रतिनिधी,

सर्वांसाठी लोकल प्रवासाबाबत या आठवड्यात घोषणा होणार असून गर्दी नियोजनासाठी राज्य सरकारकडून ”ने सामान्य मुंबईकरांना प्रवासमुभा मिळण्याचे सुस्पष्ट संकेत आहेत. यानुसार महिलांना पूर्णवेळ आणि उर्वरित प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता लोकलने प्रवास करण्याची अनुमती मिळण्याची शक्यता आहे. (Chennai Pattern for Mumbai Local Service)

करोना संसर्ग रोखण्यासाठी चेन्नई उपनगरीय रेल्वेने तीन टप्प्यात प्रवाशांना मुभा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमुभा देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात विना गर्दीच्या वेळेत महिलांना प्रवास परवानगी देण्यात आली. २३ डिसेंबर २०२० रोजी घोषित केलेल्या तिसरा टप्प्यात गर्दी नसलेल्या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

चेन्नई रेल्वेच्या धर्तीवरच मुंबई लोकलमध्ये सर्वप्रथम अत्यावश्यक व त्यानंतर विनागर्दीच्या वेळेत महिलांना प्रवासमुभा देण्यात आली. तिसरा आणि निर्णायक टप्प्यात चेन्नई पॅटर्न अर्थात महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेत प्रवास मुभा देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील कार्यालयांच्या वेळेत बदल केलेला नाही. यामुळे मर्यादित वेळेतील लोकल असून नसल्यासारखी असेल. यामुळे लोकलमुभा देऊनही प्रवास अडचणीची मूळ समस्या ‘जैसे थे’ राहील. यामुळे अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला. यामुळे सर्वांसाठी लोकल खुली या पर्यायाचा देखील समावेश प्रस्तावात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतील यावर लोकल प्रवास अवलंबून आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या सुमारे ९० टक्के फेऱ्या चालवणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला पूर्ण क्षमतेने गाड्या सुरू करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रस्तावात केल्या आहेत.

करोना काळातील उपनगरीय रेल्वे प्रवासमुभा

टप्पा- मुंबई उपनगरीय रेल्वे- चेन्नई उपनगरीय रेल्वे

पहिला टप्पा-अत्यावश्यक सेवेतील प्रवासी-अत्यावश्यक सेवेतील प्रवासी

दुसरा टप्पा – मर्यादित वेळेत महिला प्रवासी – मर्यादित वेळेत महिला प्रवासी

तिसरा टप्पा- निर्णय नाही – मर्यादित वेळेत सामान्यांना प्रवास मुभा

प्रवासाचे पर्याय

– महिलांना पूर्ण वेळ

– सामान्य प्रवाशांना गर्दी नसलेली वेळ

– सर्वांसाठी पूर्ण वेळ

– रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सामान्य प्रवाशांना

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

88 COMMENTS

  1. Excellent post. I was checking constantly this
    Extremely useful information specially the last part
    care for such info much. I was seeking this particular information for a very long
    time. Thank you

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here