वाचा:
आज पहाटे साडेचारच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटमधून ‘कोव्हिशील्ड’चे डोस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले. तत्पूर्वी, नारळ फोडून कंटेनरची पूजा करण्यात आली. परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना हा मान मिळाला. हार, फुले वाहून कंटेनरची पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा गजर केला.
वाचा:
‘कोव्हिशील्ड’चे हे कंटेनर विमानतळावर पोहोचले असून तिथून ते निश्चित स्थळी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे विमानतळ प्रशासनानं त्याबाबतचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत. पुण्यातून कोव्हिशिल्ड लस देशातील १३ शहरांत पाठवण्यात येणार आहे. त्यात औरंगाबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, कर्नाल, विजयवाडा, हैदराबाद, लखनऊ, चंदीगड, भुवनेश्वर, गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे.
वाचा:
केंद्र सरकारनं सीरमच्या ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सीन’ या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. ही लस देशाबाहेर देखील निर्यात करण्याचा सरकारचा विचार आहे. लसीच्या निर्यातीला परवानगी मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times