नवी दिल्ली : देशात विषाणूनं हातपाय पसरण्याची तयारी सुरू केलीय. देशातील १० राज्यांत बर्ड फ्लू संक्रमण अर्थात ‘एव्हियन एन्फ्लुएन्जा’ फैलावल्याचं स्पष्ट झालंय. सोमवारी महाराष्ट्र, दिल्लीनंतर उत्तराखंडातही बर्ड फ्लूची पुष्टी करण्यात आलीय.

१० राज्यांत बर्ड फ्लूचा शिरकाव

देशात आत्तापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांत बर्ड फ्लू आढळला आहे.

दिल्ली : हेल्पलाइन क्रमांक

राजधानी दिल्लीत बर्ड फ्लूच्या दशहतीदरम्यान दिल्लीच्या सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहे. बर्ड फ्लू संक्रमणाची माहिती देण्यासाठी एक आपात्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय. नागरिकांनी २३८९०३१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. जिवंत पक्षी आयात करण्यावरदेखील बंदी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई, महाराष्ट्र : हेल्पलाईन क्रमांक

बर्ड फ्लू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.

ठाणे, महाराष्ट्र : हेल्पालाईन क्रमांक

ठाणे महानगरपालिकेकडूनही हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२१०८ किंवा ०२२ – २५३७१०१० या क्रमांकावर पक्ष्यांच्या मृत्यूशी संबंधित तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिक संपर्क साधू शकतात.

मानवात संक्रमण आढळलेलं नाही

देशात अनेक ठिकाणी पक्षांमध्ये बर्ड फ्लू संक्रमण आढळलं असलं तरी मानवांमध्ये मात्र अद्याप हे संक्रमण आढळून आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर बर्ड फ्लू संक्रमण रोखण्यासाठी राज्यांना कोंबड्यांची विक्री किंवा कुक्कुट उत्पादनांवर बंदी न घालण्याची विनंती केलीय. उपभोक्त्यांना चिकन आणि अंडी योग्य पद्धतीनं शिजवून खाण्याचं आवाहन करण्यात आलंय.

बर्ड फ्लू मानवांमध्ये कसा पसरतो

संक्रमित पक्षी किंवा संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास मानवांमध्ये हे संक्रमण पसरू शकतं. बर्ड फ्लू विषाणू डोळे, नाक आणि तोंडाद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश मिळवू शकतात. यावर उपाय म्हणजे, संक्रमित पक्षी किंवा मेलेल्या पक्ष्यांपासून लांब राहा. तसंच संक्रमित भागात प्रवेश करणं टाळा. चिकन – अंडी खाणं काही काळ टाळलेलंच बरं. किंवा मांसाहारी पदार्थ योग्य पद्धतीने शिजवून मगज खा.

बर्ड फ्लू संक्रमणाची लक्षणे

श्वास घेण्यात अडचण, कफ कायम राहणं, डोकेदुखी, सर्दी, घशात सूज येणं, स्नायू दुखणं, उलट्या, ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here