अहमदनगर: ‘गेल्या दहा वर्षांत मी कधीही कोणाला दमदाटी केलेली नाही. उलट मी गृहराज्यमंत्री होतो तेव्हा लोकच मला कामासाठी दमदाटी करायचे. त्यामुळे मी आता कोणाला दमदाटी करण्याचा प्रश्नच नाही,’ असे सांगत माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणे आणि कार्यकर्त्यांना दमबाजी करणे यावरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. ( Vs in Gram Panchayat Elections)

वाचा:

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी पवार यांनी ३० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. त्यावर टीका करताना शिंदे यांनी हे प्रलोभन असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर बोलताना पवार यांनी कार्यकर्त्यांना होणारी दमबाजी खपवून घेणार नाही. आपणही सामाजिक गुंड आहोत, असे उत्तर दिले होते. एकमेकांची नावे न घेता आरोपप्रात्यारोपांच्या फैरी या दोघांमध्ये सध्या झडत आहेत. तोच धागा पकडून शिंदे यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. कर्जतच्या जोगेश्वरवाडी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

वाचा:

ते म्हणाले, ‘आपल्यासमोर लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी कसेही बोलले तरी चालते. आपण कधीही कोणाला दमदाटी करत नाही. गृहराज्यमंत्री होतो तरी लोकच मला दमदाटी करायचे. शेवटी लोकांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असते. सत्तर वर्षांत आपल्या लोकांना काही मिळाले नाही. त्यामुळे आपली कामे करून घेण्यासाठी लोक भांडले तर यात मला काहीच गैर वाटत नाही. राजकारणात हार-जीत असतेच. पदापेक्षा सर्वसामान्यांना मी महत्त्व देतो. ‘नवे पर्व आणि विसरा सर्व’ अशी परिस्थिती सध्या या मतदारसंघात आहे. आपल्या काळात सुरू करण्यात आलेली अनेक कामे ठप्पे झाली आहेत. जेव्हा निवडून गेलो तेव्हा एकच ठरविले की खोटे बोलायचे नाही. जे आहे, जे होणार आहे तेच सांगायचे. समजा एखादा शब्द बोललोच आणि ते काम होण्यात अडचण येत असेल तर काहीही झाले तरी ते करून दाखवाचेच, अशी आपली भूमिका होती. काम झाले नाही तर तक्रार ऐकायला लोकप्रतिनिधी उपलब्ध असले पाहिजेत. मात्र, या बाबतीत गेल्या दीड वर्षात या मतदारसंघाची परिस्थिती खूपच बदलली आहे,’ असेही शिंदे म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि त्यानंतर येणारी जामखेड नगरपालिका व कर्जत नगरपंचायतीची निवडणूक यामुळे या दोन नेत्यांमधील राजकीय संघर्ष वाढत जाण्याची शक्यता आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here