पुणेः विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाशिव पेठेत एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृत्यू सहा दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शवविच्छेदनानंतर हा खून आहे की अकस्मात मृत्यू हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा खून असावा असा संशय व्यक्त केला आहे.

वाचा:

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाशिव पेठेत ब्राह्मण मंगल कार्यालयाची एक गल्ली आहे. या गल्लीमध्ये हॉटेल मराठा कोल्हापूर दरबार हॉटेल असून या हॉटेलच्या वरती एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सकृतदर्शनी हा खून असावा असा पोलिसांचा संशय आहे. विश्रामबाग पोलिस तसेच डॉक्टरांचे पथक हे घटनास्थळी पोहोचले आहे. फ्लॅटमध्ये एक कामगार दाम्पत्य राहत होते. गेल्या सहा दिवसांपासून हा फ्लॅट बंद आहे. मृतदेह कुजल्यामुळे त्याचा वास येऊ लागला. त्यानंतर पोलिसांना स्थानिकांनी माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता, बाथरूम मध्ये हा मृतदेह पोलिसांना सापडला. या मृतदेहावर फ्लेक्स टाकण्यात आला होता. त्यामुळे हा खून असावा, असा पोलिसांना संशय आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here