नियोम: शहर म्हटले की, चांगले चौपदरी रस्ते आले, त्यावरून धावणारी वाहने आली, मोठ्या इमारतीही आल्या. मात्र, सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान एका नव्या शहराची निर्मिती करणार असून या शहरात वाहने, रस्ते नसणार आहेत. हे नवीन शहर शून्य कार्बन उत्सर्जन (Zero Carbon Emission City) शहर असणार आहे. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हे शहर १७० किमी क्षेत्रफळात वसवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या वृत्तानुसार, या नव्या शहराचे नाव ‘द लायन’ असणार आहे. हे शहर सौदी अरेबियाच्या निओम प्रकल्पाचा भाग असणार आहे. सौदी अरेबियाने निओम प्रकल्पावर ५०० अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ३६ लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सौदी अरेबियाच्या या नव्या शहरात १० लाख नागरिकांचे वास्तव्य असणार आहे. या शहरात आरोग्य केंद्र, शाळा, पर्यावरणपूरक सुविधा असणार आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे शहरात २०३० पर्यंत तीन लाख ८० हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. या शहरात लोकांना पायी चालावे लागणार आहे. सर्व सुविधा लोकांना जवळच उपलब्ध असणार आहे. या शहराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १०० ते २०० अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे.

वाचा:

वाचा:
क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितले की, विकास करत असताना निसर्गाचा बळी देता कामा नये. हे नवीन शहर मानवी समाजासाठी आणि मानवतेच्या दृष्टीने क्रांती असणार आहे. या शहरात २० मिनिटापेक्षाही अधिक वेळ चालावे लागणार नाही. या शहरात अल्ट्रा हायस्पीड ट्रान्झिट आणि ऑटोनॉमस मोबिलिटी सोल्यूशन उपलब्ध असणार आहे. हा प्रकल्प क्राउन प्रिन्स सलमान यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे म्हटले जाते.

वाचा:

क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी २०१७ मध्ये निओम प्रकल्पाची घोषणा केली होती. सौदी अरेबिया हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. मात्र, भविष्यात होणारे बदल पाहता सौदीने अर्थव्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात तेलाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असून नव्या तंत्रज्ञानामुळे तेलावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सौदी अरेबिया आपल्या अर्थव्यवस्थेची रचना करत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here