मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. शिवाजी पार्क येथे टेनिस खेळताना त्यांना ही दुखापत झाली असून त्यांनी हाताला प्लास्टर केलं आहे. त्याच स्थितीत ते आज पक्षाच्या बैठकीला पोहोचले व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ( suffers hand fracture)

वाचा:

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आज मनसैनिकांना दिले आहेत. त्यासोबतच, आगामी काळात राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक होत आहे. त्या बैठकीला संबोधित करण्यासाठी आज सकाळी राज ठाकरे वांद्र्यात पोहोचले. त्यावेळी त्यांच्या हाताला प्लास्टर केलेले दिसले. त्यामुळं चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, राज यांची दुखापत काळजी करण्यासारखी नसल्याचं सांगण्यात येतंय. राज यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हाताला सपोर्टर लावलं आहे.

वाचा:

राज ठाकरे हे कला व क्रीडाप्रेमी आहेत. फिटनेस राखण्यासाठी त्यांनी अलीकडं टेनिस खेळणं सुरू केलं आहे. अलीकडेच शिवाजी पार्क जिमखान्यात चिरंजीव अमित यांच्यासोबत टेनिस खेळतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. याआधीही त्यांना अशीच दुखापत झाली होती. त्यावेळीही त्यांनी हाताला सपोर्टर बांधलं होतं.

वाचा:

राज ठाकरे यांना पाहून मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी हाताला काही लागलं का असा प्रश्न विचारला. त्यावर, तुला काय वाटलं मी असंच बांधलंय का?,’ असा प्रतिप्रश्न पानसेंना केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here