रोहित पवार हे काही दिवसांपूर्वी भल्या सकाळी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये गेले होते. तिथं त्यांनी माथाडी कामगार व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविषयी अनेकांची मतंही त्यांनी जाणून घेतली. त्यावेळी त्यांना लोकल ट्रेनअभावी माथाडी कामगारांना होणाऱ्या त्रासाचीही जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी लगेचच राज्याचे परिवहनमंत्री यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
वाचा:
रोहित यांनी स्वत: त्या संदर्भातील ट्वीट केलं आहे. ‘लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत #APMC मार्केटमध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती अनिल परब यांना केली आहे,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ‘चेन्नई पॅटर्न’च्या धर्तीवर मुंबईतही सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार होत आहे. चेन्नई रेल्वेच्या धर्तीवरच मुंबई लोकलमध्ये सर्वप्रथम अत्यावश्यक व त्यानंतर विनागर्दीच्या वेळेत महिलांना प्रवासमुभा देण्यात आली. तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यात महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेत प्रवासमुभा देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे, असे राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times