नवी दिल्लीः न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने टी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. भारतीय संघाने मालिका जिंकावी, अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे () अध्यक्ष यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यंदा मालिका विजयाची चांगली संधी भारताकडे आहे. मागीलवेळी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ ने जिंकली होती. यावेळी भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकावी, अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.

प्रत्येक मालिका सारखेच महत्त्व असले, तरीदेखील कसोटी मालिकाविजय हा विशेष असतो. आताच्याघडीला भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकायची चांगली संधी आहे, असे गांगुली यांनी सांगितले.

कर्णधार विराट कोहलीला आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले असून, संघाने आपल्या कामगिरीवर लक्ष्य केंद्रीत करावे. अन्य कोणताही ताण त्यांनी घेऊ नये. खेळाडूच्या कामगिरीत सातत्य कसे राहील, यावरही संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे, असे गांगुली यांनी नमूद केले.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलबद्दल निर्णय घेतला आहे. लोकेश राहुल याला यष्टीरक्षणासाठी पाठवणे, हा कर्णधार कोहली आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे, असे गांगुली यांनी म्हटले होते.

दरम्यान, दौऱ्यावर असलेला भारतीय संघ ५ सामन्यांची टी-२० मालिका, ३ सामन्यांची वन-डे मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नववर्ष २०२० मधील भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा असून, भारतीय संघ या दौऱ्यावर कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here