धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं अत्याचार केल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व आरोप खोटे असून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. तसंच, या महिलेसोबत परस्पर संमतीने संबंध होते. व आम्हाला दोन मुलं असल्याचाही धक्कादायक खुलासा केला होता. धनंजय मुंडे यांच्या या खुलाश्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जोरदार टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ३ महिलांसोबत संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मत्रिमंडळातून बाहेर राहावे, अशी मागणी केली आहे. तसंच, महाराष्ट्राच्या संस्कृती, इथली अस्मितेला धक्का पोहोचला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times