नागपूर: नायलॉन मांजाने गळा चिरल्याने २० वर्षीय युवकाचा तडफडून मृत्यू झाला. हृदयाचा थरकाप व अंगावर शहारे आणणारी ही घटना जाटतरोडी भागात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारा घडली.

प्रणय प्रकाश ठाकरे रा. ज्ञानेश्वरनगर,असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी प्रणय व प्रकाश वेगवेगळ्या मोपेडने तहसीलमध्ये जात होते. जाटतरोडी भागात नायलॉन प्रणय याच्या गळ्याला अडकला. प्रणयचा गळा चिरला. गळा चिरताच रक्ताची धार बाहेर निघाली. प्रणय मोपेडवरून खाली कोसळला. त्याच्या वडिलांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेत प्रणय याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून प्रणय याला मृत घोषित केले. इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान मानेवाडा भागात मांजाने २२ वर्षीय युवकाचा हात कापल्या गेल्याची माहिती आहे. सौरभ,असे जखमीचे नाव आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here