सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसला आपत्कालीन वापरास गेल्या आठवड्यात मंजुरी देण्यात आली होती. यानंतर आता केंद्र सरकार १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करणार आहे. यासाठी लसीच्या सहा कोटी डोसच्या खरेदीची ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरची एकूण किंमत सुमारे १३०० कोटी रुपये असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. करोनावरील लसीकरण गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून जवळपास ५० देशांमध्ये सुरू आहे. यानुसार आतापर्यंत फक्त अडीच कोटी नागरिकांना लस दिली गेली आहे. तर पुढील काही महिन्यांत ३० कोटी नागरिकांना लस देण्याचं भारताचं लक्ष्य आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या लसीकरणाचा खर्च पीएम केअर्स फंडमधून केला जाईल, असं सांगण्यात येतंय. करोना व्हायरसचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पीएम केअर्स फंडची स्थापन करण्यात आला. त्याची स्थापना, नियम आणि वैधता यावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
करोना संकटाच्या काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ मार्चला पंतप्रधान मोदींनी स्थापन केला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times