बगदाद: इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे नाहीत. इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ पाच रॉकेट डागल्याचं वृत्त आहे. असं म्हटलं जातंय की हा हल्ला इराणने केला आहे. सुलेमानींच्या हत्येनंतरही इराणने अशीच कारवाई केली होती. इराणने इराकमधील अमेरिकेच्या सैन्यस्थळांवर हल्ला केला होता. आधी अमेरिकेने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं म्हटलं होतं, मात्र नंतर ३४ सैनिक जखमी झाल्याचं मान्य केलं होतं.

मंगळवारीदेखील इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ दोन रॉकेट डागण्यात आले होते. यात कोणी जखमी झालं नव्हतं पण आणि अमेरिकेत तणाव वाढला होता. अमेरिकी दूतावास बगदादच्या मध्यावर आहे. या दूतावासाच्या आसपास सरकारी इमारती आहेत.

सुलेमानींच्या हत्येनंतर इराणमध्ये अमेरिकेविरोधात प्रचंड रोष होता. सूडाच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले होते. यानंतर इराणमधील अमेरिकेच्या सैन्यस्थळांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. या सूडाच्या कारवाईत चुकून एक युक्रेन विमानही अपघातग्रस्त झालं होतं. यात १७६ लोक मृत्युमुखी पडले होते. इराणने आधी या हल्ल्याचा इन्कार केला होता. मात्र नंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे इराणने हे मान्य केलं की विमान दुर्घटनेमागे इराणची चूक होती.

वाचा:

वाचा: वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here