दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि प्रभावी कारवाईची खात्री करण्यासाठी आठ-कलमी कृती आराखड्याचा प्रस्तावही जयशंकर यांनी दिला. ‘दहशतवादाविरोधातील लढाईत आंतरराष्ट्रीय सहकार्य’ या खुल्या चर्चेत भाग घेतला.
१ जानेवारी २०२१ ला भारताने यूएनएससीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची ही पहिली वेळ होती. जगाने दहशतवादाविरूद्ध ‘झिरो टॉलेरन्स’ दाखवण्याची वेळ आता आली आहे. पाकिस्तानचं नाव न घेता परराष्ट्रमंत्र्यांनी मंचाला भारत अनेक दशकांपासून दहशतवादाविरुद्ध कसा लढा देतोय, याची माहिती दिली.
दहशतवादाविरूद्धच्या लढाईत दुहेरी निकषांना कुठलेही स्थान नाही. दहशतवादी हे दहशतवादी असतात. चांगले आणि वाईट यात फरक असू शकत नाही. जे लोक असा भेद करतात त्यांचा अजेंडा असतो. ते दहशतवाद्यांच्या कारवाया लपवतात. यामुळे तेही दहशतवाद्यां इतकेच दोषी आहेत, असं जयशंकर म्हणाले.
पाकिस्तानवर निशाणा साधला
दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटीत गुन्हेगारी ओळखणं आवश्यक आहे आणि कठोरपणे कारवाई करणं गरजेचं आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटांसाठी ( ) जबाबदार गुन्हेगारांना फाइव्ह स्टार पाहुणचार मिळाल्याचं आम्ही बघितलं आहे, असं म्हणत जयशंकर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरून पाकिस्तानचा उल्लेख न करता लक्ष्य केलं.
दहशतवाद मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. त्याचवेळी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर ( ) यूएनएससीने १३७३ प्रस्तावाला मंजुरी देऊन या धोक्याचा सामना करण्यासाठी दृढ वचनबद्धता व्यक्त केली. करोना व्हायरसच्या संकटामुळे दहशतवाद्यांची भरती आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देण्याने स्थिती चिंताजनक बनली आहे, असं ते म्हणाले.
सोशल मीडिया नेटवर्कद्वारेही कट्टरतावादाला प्रोत्साहन आणि त्यांच्या भरतीत मोठी भूमिका आहे. दहशतवादाला होणारे फंडींगही मोठी समस्या आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांना होणारा वित्त पुरवठा खंडीत करणं गरजेचं आहे, असं एस. जयशंकर म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times