नवी दिल्ली: भारताचा जलद गोलंदाज एस श्रीसंतने सोमवारी क्रिकेट मैदानावर कमबॅक केले. सात वर्षांनी (एकूण २ हजार ८०४ दिवसांनी) मैदानावर परतला आणि त्याने पहिली विकेट घेतली. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेत केरळच्या संघात निवड झालेल्या श्रीसंतने पहिल्याच सामन्यात बोल्ड घेतली.

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी सात वर्षबंदीला सामोरे गेल्यानंतर श्रीसंतने पहिल्या सामन्यात घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याने पुदुच्चेरीच्या फाबिद अहमदची विकेट घेतली.

वाचा-

स्पर्धेतील ग्रुप-ईच्या लढतीत केरळने पुदुच्चेरीवर ६ विकेटनी विजय मिळवला. त्यांनी २० षटकात १३८ धावा केल्या. केरळने विजयाचे लक्ष्य ४ विकेटच्या बदल्यात पार केले. मोठ्या कालावधीनंतर क्रिकेट सामना खेळणाऱ्या श्रीसंतने हा व्हिडिओ शेअर करताना तुमचा पाठिंबा आणि प्रेम यासाठी धन्यवाद. ही तर पक्त सुरूवात आहे, असे म्हटले आहे.

वाचा-

भारताकडून श्रीसंतने २७ कसोटी, ५३ वनडे आणि १० टी-२० लढती खेळल्या आहेत. २०१३ साली त्याने आयपीएलमध्ये अखेरची विकेट घेतली होती. श्रीसंतने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

बीसीसीआयने आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर ऑगस्ट २०१३ साली बंदी घातली होती. श्रीसंतसह राजस्थान रॉयल्सच्या अजित चंदीला आणि अंकित चव्हाण यांच्यावर देखील बंदी घातली गेली होती. गेल्या वर्षी श्रीसंतवरील बंदीचा कालावधी कमी करून तो ७ वर्ष इतका केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here