मेरठ, उत्तर प्रदेश : देशात मोहिमेला येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. याच दरम्यान करोना लशीसंबंधी उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपचे आमदार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ‘ज्या मुस्लिमांना देशात तयार झालेल्या कोव्हिड लशीवर विश्वास नसेल त्यांनी पाकिस्तानात जावं’ असं वक्तव्य भाजपच्या आमदारांनी केलंय.

‘टाईम्स नाऊ’ या चॅनलशी बोलताना संगीत सिंह सोम यांनी हे वक्तव्य केलंय. संगीत सिंह सोम हे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरधना मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील शास्त्रज्ञांवर ज्या मुस्लिमांचा विश्वास नसेल त्यांनी पाकिस्तानात जावं’ असं सोम यांनी म्हटलंय.

‘काही मुस्लिमांचा आपल्या देशावर, आपल्या देशातील शास्त्रज्ञांवर, आपल्या पोलिसांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास नाही, हे दुर्दैवी आहे. त्यांचा आत्मा पाकिस्तानात आहे. त्यांनी पाकिस्तानातच जावं आणि आमच्या शास्त्रज्ञांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये’ असं संगीत सिंह सोम यांनी म्हटलंय.

करोना लशीत डुक्कराची चरबी मिसळल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात आला होता. यासंदर्भात आमदार संगीत सिंह सोम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या विषयावर सोशल मीडियावरही अनेक प्रकारच्या अफवांना ऊत आला आहे. याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफवांना वेळीच रोखण्याचं आव्हान समोर असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, देशात मंगळवारी १५,९६८ करोना रुग्णांची भर पडल्यानंतर देशातील आत्तापर्यंतची एकूण रुग्णसंख्या १ कोटी ०४ लाख ९५ हजार १४७ वर पोहचलीय.

मंगळवारी एकूण २०२ मृत्युंची नोंद करम्यात आलीय. यानंतर आत्तापर्यंतचा एकूण मृत्युंचा आकडा १ लाख ५१ हजार ५२९ वर पोहचलाय.

सध्या देशात २ लाख १४ हजार ५०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल १ कोटी ०१ लाख २९ हजार १११ जणांना करोनावर मात केलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here