वाचा:
समीर हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान आणि करण संजानी यांच्यात ‘गुगल पे’च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला आहे, असा संशय एनसीबीला आहे. याच संदर्भात चौकशीसाठी समीर खान यांना बोलावण्यात आलं आहे.
वाचा:
एनसीबीच्या पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी यांच्याशी समीर यांच्यात २० हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?,’ याची माहिती एनसीबीकडून घेतली जाणार आहे.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात नाव आलेल्या ‘मुच्छड पानवाला’चा मालक रामकुमार तिवारी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times