मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ माजला आहे. मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसनं भाष्य केलं आहे.

हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी दिला होता. भाजपने केलेल्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी तसं ट्विटही केलं आहे.

‘हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपातील काही नेते टेन्शनमध्ये आले असतील,’ असा खोचक टोला सावंत यांनी लगावला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी महाविकास आघाडीतून अद्याप एकाही नेत्यानं अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाहीये. त्यामुळं या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला आहे.

एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here