मुंबई-
अभिनेत्री परिणीती चोप्राचा आगामी ” या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.
रिभू दासगुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या सिनेमाची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पुढच्या महिन्यात २६ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात
किर्ती कुल्हारी आणि आदिती राव हैदरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘द गर्ल ऑन दी ट्रेन’ याच नावाने बनवलेल्या इंग्रजी सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. सस्पेन्स थ्रिलर सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित होणार होता. पण करोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. पण आता निर्मात्यांनी सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यापेक्षा ऑनलाइन रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. इथे पाहा सिनेमाचा टीझर:
सिनेमात ही एका अशा मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे जी रोज ट्रेनमधून प्रवास करत असते. मात्र एक दिवस ती एका विचित्र परिस्थितीत अडकते. हा सिनेमा याच नावाने लिहिलेल्या पॉला हॉकिन्सच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित आहे. हॉलिवूडपटात परिणीतीची व्यक्तिरेखा एमिली ब्लंटने साकारली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times