भारताचे पाच खेळाडू पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाले आहेत. यामध्ये जडेजा चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. जडेजाच्याऐवजी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला भारतीय संघात स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे. आतापर्यंत सुंदर एकही कसोटी सामना खेळलेला नाही, त्यामुळे त्याला यावेळी पदार्पणाची संधी मिळू शकते, असे समजते आहे.
सिडनीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना जडेजाला दुखापत झाली होती. फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा एक चेंडू जडेजाच्या अंगठ्यावर बसला होता. त्यानंतर जडेजाचा अंगठा फ्रॅक्टर झाला होता. त्यामुळे जडेजा आता चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नसून सुंदरला यावेळी पदार्पणाची संधी मिळू शकते.
भारताच्या कोणत्या खेळाडूंना दुखापत झाली आहे, पाहा…भारताचे गोलंदाजीमधील मुख्य अस्त्र असलेल्या जसप्री बुमराला आता गंभीर दुखापत झाल्याचे समोर येत आहे. बुमराच्या ओटीपोटीमध्ये दुखत आहे. त्याचबरोबर चौथा कसोटी सामना सुरु व्हायला फक्त तीन दिवसांचा अवधी असून त्यामध्ये बुमरा फिट हाऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. आर. अश्विनच्या पाठीमध्ये उसण भरल्याचेही समजत आहे. तिसरा सामना खेळत असताना अश्विनला पाठीमध्ये दुखापत झाली होती, ही दुखापतही गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.
तिसरा सामना वाचवणारा भारताचा फलंदाज हनुमा विहारीलाही गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे, त्याचे पायाचे स्नायू दुखावले गेले आहेत. दुखापतग्रस्त असूनही तो तीन तास खेळत राहीला. पण आता हनुमाची दुखापत बळावली असल्याचे म्हटले जात आहे. हनुमाच्या जागी संघात मयांक अगरवालला स्थान मिळू शकत होते. पण सराव करत असताना मयांकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या हाताला आता हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे समजत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times