मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता चंदेरी दुनियेत तर चमकत असतोच, पण रविवारी दिनीही तो चमकत होता. निमित्त होतं त्याच्या सायकलस्वारीचं. त्याने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

आपल्या आरोग्याबाबत सलमान खान खूपच जागरुक असतो. तो व्यायाम म्हणून नेहमी चालवताना दिसतो. त्याने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मुंबईच्या रस्त्यावर तो सायकल चालवताना दिसत आहे. त्याने लिहिलंय, ‘भारत नेहमी निरोगी राहो आणि तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.’

सायकलवरूनच सेटवर पोहोचला

अलीकडे तो आपल्या आगामी सिनेमा ‘राधे: द मोस्ट वॉन्टेड भाई’ च्या सेटवर चक्क सायकल चालवत पोहोचला. त्याची सिक्युरिटी कार त्याच्या मागून मागून चालत होती आणि कुणी पटकन ओळखू नये म्हणून त्याने टोपी घातली होती.

पुढची ईदही बुक

‘राधे: द मोस्ट वॉन्टेड भाई’ ची शूटिंग सलमान करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा याने केलं आहे. हा सिनेमाही २०२० च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाव्यतिरिक्त सलमानचा आणखी एक सिनेमाही येऊ घातला आहे. २०२१ मधील ईदला सलमानचा ‘कभी ईद कभी दिवाली’ नावाचा सिनेमा येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here