डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनडाच्या क्युबेकमध्ये चार आठवड्यांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी रात्री आठ ते सकाळी पाच वाजेपर्यंत आहे. या दरम्यान नागरिकांना लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या, पाळीव श्वानाला घराबाहेर नेण्याची परवानगी देण्यात आली होती.
वाचा:
वाचा:
प्रशासनाच्या या नियमांचा आधार घेत या महिलेने आपल्या पतीच्या गळ्यात पाळीव श्वानासाठी असलेला पट्टा बांधून रस्त्यावर फिरवू लागली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही महिला शेरब्रुकमधील किंग स्ट्रीट ईस्ट भागात आपल्या पतीला घेऊन फिरत होती. त्यावेळी संचारबंदीची वेळ सुरू होऊन जवळपास तासभर झाला होता. त्याच वेळी पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता तिने आपण आपल्या श्वानासह फिरत असल्याचे स्पष्टीकरण दिले. या महिलेच्या उत्तराने पोलिसांना धक्काच बसला. हे जोडपे पोलिसांना कोणतेही सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाचा:
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या महिलेला आणि तिच्या पतीला पोलिसांनी दंड ठोठावला. या दोघांना जवळपास दोन लाख रुपयांचा दंड भरावा लागला. कॅनडामध्ये मागील काही दिवसांमध्ये करोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. आतापर्यंत १७ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी मोडणाऱ्यांना नागरिकांना दंड ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत ७५० जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times