मुंबई- याच्या निधनाला आता सात महिने झाले आहेत. एवढा काळ लोटूनही त्याचे चाहते तो नसण्याच्या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीत. दररोज ते सुशांतला न्याय मिळाला याची मागणी करत आहेत. दरम्यान, सुशांतची बहीण हिने त्याने स्वतः लिहिलेली एक चिठ्ठी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुशांतच्या चाहत्यांनी अगदी थोड्या वेळातच ही पोस्ट व्हायरल केली.

मी जसा आहे तसा आनंदी नाहीए..

सुशांतने या चिठ्ठीत लिहिले होते की, ‘मला वाटतं की मी आयुष्यातील ३० काहीतरी बनण्याच्या प्रयत्नात घालवली. मला अनेक गोष्टींमध्ये चांगलं व्हायचं होतं. मला टेनिस, शिक्षण आणि ग्रेडमध्ये चांगलं व्हायचं होतं आणि मी सर्व गोष्टींकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिलं. मी जसा आहे तसा मी आनंदी नाहीए. पण या सगळ्ययात मी गोष्टींमध्ये सर्वोत्कृष्ट होऊ शकलो का.. मला वाटतं मी चुकीच्या पद्धतीने गोष्टी हाताळत होतो. कारण मी आधीपासून काय आहे याचा शोध मला सर्वातआधी घ्यायला हवा होता.

एनसीबी आणि सीबीआय करत आहेत तपास
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याच्या बहिणींविरोधात हिने केलेली एफआयआर रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
रिपोर्टनुसार सुशांतच्या बहिणींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं दिल्याचा दावा रियाने केला होता.
तसंच त्याच्या आजारासाठी बनावट प्रिस्क्रिप्शनही बनविण्यात आले होते.
एनसीबी आणि सीबीआय सुशांत प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here