काही महिन्यांपूर्वी राखीनं लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. परंतु अद्यापही तिचा पती नेमका आहे तरी कोण? या प्रश्नाचं उत्तर कोणालाच मिळालं नाही. यावर आता राखीच्या कुटुंबियांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राखीच्या आईनं देखील राखीच्या पतीचं कौतुक केलं आहे.
‘लग्नाच्या दिवशीच माझा पती मला सोडून गेला आणि परत कधीच आला नाही’, असा खुलासाच राखीनं बिग बॉसच्या घरात केला होता. आता राखीच्या आईनं देखील राखीचं लग्न झालं असून जावई खूप चांगला असल्याचं म्हटलं आहे.
राखी सावंतच्या आईला कर्करोग असल्याचं निदान झालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी राखी आणि जावयाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘ रितेश खूप चांगला माणूस आहे. मी हॉस्पिटलमध्ये असताना त्यानं अनेकदा विचारपूस केली. हॉस्पिटलचं बिल देखील त्यानं भरलं आहे. मी त्याला सर्वांसमोर येण्याची विनंती केली आहे. त्यानं देखील मला शब्द दिलाय. तो बिग बॉसच्या मंचावर सर्वांसमोर येईल आणि राखीचा स्विकार करणार आहे’, असं राखीची आई जया यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times