पाटील आज संगमनेरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी ही भूमिका मांडली.
मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात एका महिलेनं यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी एका महिलेने स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे आहेत, असं खुलासा मुंडे यांनी केला होता. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मुंडे यांच्यावर केवळ आरोप झाले आहेत. त्याचे उत्तर त्यांनी स्वत: दिले आहे. हे प्रकरण न्यायलायातही प्रलंबित आहे. शिवाय ही त्यांची कौटुंबिक बाब आहे. एखाद्याला राजकारणात उभे राहण्यासाठी आयुष्य खर्ची घालवाले लागते. त्यामुळे कोणतीही शहानिशा न करता केवळ आरोपांवरून कोणाचे राजकीय करिअर पणाला लावता येणार नाही. या प्रकरणाकडेही याच दृष्टीने पाहिले पाहिजे. न्यायप्रवीष्ट प्रकरणांत न्यायालयाचे निकाल, चौकशीचे निष्कर्ष आल्याशिवाय केवळ राजकीय दृष्टीने काहीही घाईघाईने निष्कर्ष काढणे योग्य नाही,’ अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times