मुंबईः सर्वांसाठी लोकल प्रवासाबाबत या आठवड्यात घोषणा होणार असल्याची चर्चा असतानाच राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे.

करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकल बंद करण्यात आली होती. अनलॉकच्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर नवीन वर्षात सर्वसामान्यांनाही लोकल मुभा देण्यात येणार असल्याचं सरकारमधीलच काही मंत्र्यांकडून सांगण्यात येत होतं. लोकलविषयी येत्या आठवड्यातच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत असताना विजय वडेट्टीवार यांनीही सकारात्मक बातमी दिली आहे.

मुंबई लोकलबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आधीपासूनच राहिली आहे. लोकल सुरु होण्याची सर्वप्रथम मागणी आम्ही केली होती. लोकल सुरु करण्याबाबत काय उपाययोजना करता येईल यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार माझ्या अध्यक्षतेखाली एक बैठकही पार पडली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकल सुरु करताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी लागेल. त्यासाठी पुरेसे संख्याबळ व पोलीसबळ लागते त्या पुरवण्याचा काम आम्ही करु, असं आम्ही केंद्राला सांगितलंय. त्यामुळं पुढील आठवडाभरात मुंबई लोकलचा निर्णय अपेक्षित आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मुंबई लोकलसाठी चेन्नई पॅटर्न
करोना संसर्ग रोखण्यासाठी चेन्नई उपनगरीय रेल्वेने तीन टप्प्यात प्रवाशांना मुभा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमुभा देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात विना गर्दीच्या वेळेत महिलांना प्रवास परवानगी देण्यात आली. २३ डिसेंबर २०२० रोजी घोषित केलेल्या तिसरा टप्प्यात गर्दी नसलेल्या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. गर्दी नियोजनासाठी राज्य सरकारकडून ‘चेन्नई पॅटर्न’ने सामान्य मुंबईकरांना प्रवासमुभा मिळण्याचे सुस्पष्ट संकेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here