ज्या महिलेने मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत, त्या महिलेबाबत धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर कबुली दिली आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले. त्यांचे संबंध दोघांच्या सहमतीने झाले आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्गारांची केली आठवण
या वेळी अब्दुल सत्तार यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काढलेल्या उद्गारांची आवर्जून आठवण काढली. प्यार किया तो डरना क्या, असे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाल्याचे सत्तार म्हणाले. धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी आणि तत्संबधीची माहिती लपवल्याचा आरोप करत भाजप नेते किरीच सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यावर देखील सत्तार यांनी वक्तव्य केले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही निवडणुकीत दिलेल्या शपथपत्रांमध्ये माहिती लपवली होती. माहिती लपवणाऱ्या या नेत्यांची नावे आपण लवकरच जाहीर करू असा इशारा सत्तार यांनी भाजपला दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. भारतीय जनता पक्षाने मुंडे यांना टीकेचे लक्ष्य करत राजीनाम्याची मागणी केली आहे. आरोपांच्या गदारोळात आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची भेटही घेतली.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times