मुंबईः राज्यात आज ७० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ३ हजार ००९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या राज्यात ५२ हजार ३६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात आता लसीकरणाची तयारीही करण्यात येत असली तरी राज्यातील करोनाची परिस्थिती थोडी चिंताजनक आहे. आज राज्यात ३ हजार ००९ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आजपर्यंत रुग्ण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८ लाख ७४ हजार २७९ इतकी झाली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७५% एवढे झाले आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी बाधितांचा आकडाही काहीसा चिंता वाढवणारा आहे. आज राज्यात ३ हजार ५५६ करोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १९ लाख ७८ हजार ०४४ इतके झाले आहे. तर, राज्यात सध्या ५२ हजार ३६५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण करोनाबळींची संख्या ५० हजार २२१ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३५,६२,१९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७८,०४४ (१४.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२६,५९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here