लसची पहिली खेप बुधवारी सकाळी ६.४० वाजता एअर इंडियाच्या विमानाने हैदराबादहून दिल्लीला पाठवली गेली. या शिवाय ही लस बेंगळुरू, चेन्नई, पाटणा, जयपूर, लखनऊला पाठवण्यात आली. आज एकूण १४ कन्साइंन्मेंट पाठवण्यात येणार होत्या, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एएनआयने हे वृत्त दिलंय.
कोविशिल्डचे १.१ कोटी डोस आणि कोवॅक्सिनच्या ५५ लाख डोसची ऑर्डर देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाने दिली. या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. आयसीएमआरसोबत संयुक्त कार्यक्रमांतर्गत भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. सुरवातीच्या ३८.५ लाख डोससाठी २९५ रुपये प्रति डोस आकारत आहे. तसंच केंद्र सरकारला १६.५ लाख डोस विनामूल्य देण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे.
केंद्र सरकारला ५४,७२,००० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १४ जानेवारीपर्यंत सर्व राज्यांना पहिल्या टप्प्यातील संपूर्ण डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली. दोन्ही लस कोरोनाविरूद्ध प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन डोस दिले जातील. पहिल्या डोसच्या २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसानंतर त्याचा प्रभाव सुरू होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times