दाक्षिणात्य सुपरस्टार म्हटल्यावर पूर्वी रजनीकांत, कमल हसन, प्रकाश राज असे काही चेहरे डोळ्यांसमोर यायचे. ही मंडळी हिंदी सिनेसृष्टीत देखील प्रचंड सक्रिय असायची. किंबहुना आजही आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत दाक्षिणात्य कलाकारांची नवी फळी केवळ दक्षिणेकडील प्रेक्षकांच्या मनावरच नाही तर संपूर्ण देशात म्हणजेच बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवतेय. ‘बाहुबली’ सिनेमानंतर अभिनेता प्रभास केवळ दाक्षिणात्य कलाकार म्हणून ओळखला जात नाही. तर ‘पॅन इंडिया स्टार’ अशी उपाधीच त्याला मिळाली आहे. त्याच्या पंगतीत आता , यश, अलू अर्जुन, विक्रम यांसारखे दमदार सुपरस्टार देखील आहेत.

थलपति विजयची मुख्य भूमिका असलेला ‘मास्टर’ हा चित्रपट आज तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होतोय. देशातील इतर भाषिक प्रेक्षकही या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. अभिनेता विजय केवळ दाक्षिणात्य कलाकार म्हणून मर्यादित राहिलेला नसून देशभर त्याचे चाहते आहेत. म्हणूनच हा चित्रपट आता हिंदीतही प्रदर्शित होतोय. दाक्षिणात्य कलाकार देशभर हिट ठरताहेत याचं आणखी एक उदाहरण म्हणजे अभिनेता यश. काही दिवसांपूर्वीच यशच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर २’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला होता. अवघ्या काही तासांमध्येच या टिझरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हा सिनेमा ओटीटीवर नाही तर मोठ्या पडद्यावर थिएटरमध्येच प्रदर्शित होणार समजल्यावर चाहत्यांमध्ये जल्लोष होता.

बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळखअभिनेता धनुष आणि आर. माधवन यांनी यापूर्वीची बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आगामी काळात प्रभासचा ‘राधे श्याम’, ‘आदिपुरुष’ सारखे बिगबजेट सिनेमे बहुभाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. तर दुसरीकडे राणा डग्गुबाटीचा आगामी ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट दाक्षिणात्य भाषेसह हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडा देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. अभिनेत्री अनन्या पांडेसह तो करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. प्राथमिक स्वरूपात या सिनेमाचं ‘फायटर’ असं नाव निश्चित झाल्याचं कळतंय. तसंच अभिनेता अलू अर्जुन हा ‘पुष्पा’च्या निमित्तानं तर अभिनेत्री रश्मीका मंदाना ही ‘मिशन मजनू’ या सिनेमाच्या निमित्तानं बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत.

बहुभाषिक चित्रपटअनेक बॉलिवूड सिनेमे हे दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहेत. तसंच मुळचे दाक्षिणात्य सिनेमे हे हिंदीत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यात प्रामुख्यानं ‘मास्टर’, ‘राधे श्याम’, ‘आर आर आर’, ‘केजीएफ २’, ‘फायटर’, ‘आदीपुरुष’, ‘हाथी मेरे साथी’, ‘पुष्पा’, ‘पोंनियिन सेलवन’, ‘मिशन मजनू’ आदी सिनेमांची नावं घेता येतील.

दिग्दर्शक अग्रेसरदाक्षिणात्य दिग्दर्शकही बॉलिवूडमध्ये भाव खाऊन जात आहेत. यापूर्वी प्रभू देवा यांनी सलमान खानचे अनेक सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. तर बाहुबली सिनेमांचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनाही देखील बॉलिवूडमध्ये हिंदी चित्रपटांसाठी विचारलं जातं. राघव लॉरेन्स, संदीप रेड्डी वांगा यांनी देखील बॉलिवूडला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं आहे.

हे दाक्षिणात्य कलाकार चर्चेतप्रभास

धनुष

विजय

आर माधवन

विजय देवरकोंडा

अलू अर्जुन

विक्रम

विजय सेतुपाती

श्रुती हसन

तमन्ना भाटिया

इलियाना डिक्रूज

रश्मीका मंदाना

एन. टी. रामा राव ज्युनिअर

राम चरण

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here