नवी दिल्ली : भारताचा फलंदाज हनुमा विहारीने दुखापत होऊनही तीन तास किल्ला लढवला आणि भारतीय संघाला सामना वाचवण्यात यश मिळवून दिले. पण भाजपाच्या एका नेत्याने विहारीवर टीका केली. पण या टीका करणाऱ्या भाजपा नेत्याचे दात विहारीनेच घशात घातल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

पाहा नेमकं काय घडलं…भाजपाचा नेता आणि गायक असलेल्या बाबुल सुप्रियोने विहारीवर एका ट्विट द्वारे जोरदार टीका करण्यात करण्याचा प्रयत्न केला. सुप्रियोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ” हनुमाने यावेळी १०९ चेंडूंत फक्त सात धावा केल्या. हनुमाने यावेळी भारतीय संघाला ऐतिहासिक विजयापासून परावृत्त केलेच पण त्याने क्रिकेट या खेळाची देखील हत्या केली. हा एका प्रकारचा गुन्हाच आहे.” पण सुप्रियोने यावेळी एक मोठा चुक केली. त्याने हनुमाचे आडनाव विहारीऐवजी बिहारी लिहिले आणि त्यानंतर तो चांगलाच ट्रोल झाला.

हनुमाने काय दिले उत्तर, पाहा…सुप्रियोने टीका केल्यावर हनुमाने यावेळी फक्त दोन शब्दांमध्येच त्याचे दात घशात घातले. हनुमाने यावेळी एक ट्विट केले आणि त्यामध्ये आपले बरोबर असलेले नाव हनुमा विहारी असे लिहिले. टीका करणाऱ्याला आपले नावही माहिती नाही आणि तो क्रिकेटच्या बाता मारत असल्याचे यावेळी हनुमाने फक्त दोन शब्दांतून दाखवून दिले. त्यानंतर सुप्रियोवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाल्याचेही पाहायला मिळाले.

पाहा सेहवाने नेमकं काय लिहिलं…भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही यावेळी सुप्रियोवर टीका करण्याची संधी सोडली नाही. सेहवागने यावेळी ट्विट करत लिहिले की, ” आपला विहारी, सर्वांवरच भारी.” काही चाहत्यांनीही यावेळी सुप्रियोला ट्रोल करत हनुमाची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले.

भारताचा फरकीपटू आर. अश्विननेही यावेळी एका शब्दांत ट्विट करत आपले मत नोंदवले आहे.

हनुमाने जसा मैदानात उत्तम बचाव केला तर त्याने ट्विटरवरही केल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता ज्या व्यक्तीला क्रिकेटचे नाही तो भारतीय क्रिकेटपटूंवर टीक करायला धजावणार नाही, असेच या प्रकरणातून पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here