ब्रिस्बेन, IND vs AUS : तिसऱ्या कसोटी सामन्यात वाईट कृत्य करणारा ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथवर आता जोरदार टीका होत आहे. त्यामध्ये भारताच्या माजी क्रिकेटपटूने बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या खास शैलीत स्मिथला ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. या क्रिकेटपटूचे ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफर हा आपल्या ट्विटमुळे चांगलाच चर्चेत असतो. आता स्मिथवर त्याने एक ट्विट बनवले आहे. या ट्विटमध्ये जाफरने शोले या प्रसिद्ध चित्रपटातील एक संवाद वापरला आहे. या चित्रपटात अमिताभ बसंतीच्या मावशीकडे धमेंद्र यांचं स्थळ घेऊन येतात. त्यावेळी अमिताभ यांचा एक संवाद चांगलाच प्रसिद्ध झाला होता, तो म्हणजे, ” क्या बताऊ मौसीजी, लडका हिरा है हिरा…” हाच संवाद वापरत जाफरने स्मिथला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. जाफरचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले असून चाहत्यांच्या ते पसंतीस उतरले आहे. चाहत्यांनी यावेळी स्मिथवर जोरदार टीका केली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या काही आजी-माजी खेळाडूंनी यावेळी स्मिथची बाजू घेतली होती. या सर्वांना एकाच ट्विटमध्ये जाफरने चांगलाच टोला लगावल्याचे पाहायला मिळत आहे.

पाहा नेमकं काय आहे प्रकरण…तिसऱ्या सामन्याच्या पंतने पाचव्या दिवशी दमदार फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला ती भारी पडली. पंतला लवकर बाद करण्यासाठी यावेळी स्मिथने एक वाईट कृत्य केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक फलंदाज जेव्हा बॅटींगला सुरुवात करतो त्यापूर्वी तो क्रीझमध्ये गार्ड घेतो. त्या गार्डवर तो आपली बॅट ठेवून फलंदाजी करत असतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजासाठी गार्ड हा महत्वाचा असतो. पण यावेळी पंतचा गार्ड पुसुन टाकण्याचे काम यावेळी स्मिथ करताना दिसला.

स्मिथने आपल्या बुटांनी पंतचे गार्ड पुसुन टाकले. स्मिथ जेव्हा हे वाईट कृत्य करत होता, तेव्हा स्टम्पच्या कॅमेरामध्ये ही गोष्ट टिपली गेली. त्यामुळे स्मिथचे हे कृत्य आता क्रिकेट विश्वासमोर आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी स्मिथला चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here