ही घटना घडल्यानंतर आयोगाने भंडारा जिल्हाधिकाऱ्याला या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देत ४८ तासांत तथ्यावर आधारित अहवाल पाठवण्याबाबत पत्र लिहिले होते. मात्र आतापर्यंत आयोगाला जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल प्राप्त झालेला नाही.
शनिवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात सिक न्यूबॉर्न केअर यूनिटमध्ये लागलेल्या आगीत () १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एक महिन्यांपासून ते तीन महिने इतक्या वयाच्या बालकांचा समावेश होता. या यूनिटमध्ये एकूण १७ मुले होती. त्यांपैकी ७ बालकांना वाचवण्यात यश आल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर प्रमोद खांडते यांनी माहिती देताना सांगितले.
राज्यपालांनी केली नुकसान भरपाईची घोषणा
बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयात आग लागणे ही अतिशय दु:खद आहे, असे राज्यपाल म्हणाले. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपाल म्हणाले. या दुर्घटनेतून वाचलेल्या मुलांच्या मातांचीही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट घेतली. राज्यपालांसोबत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे आणि इतर अधिकारी देखील होते.
क्लिक करा आणि वाचा-
केंद्राकडून दोन लाख रुपयांची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भंडारा येथील आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून सोमवारी दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच, गंभीर जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times