सिद्धू यांच्या आधी कॉंग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनीही प्रतिक्रिया दिली. कृषी कायद्यांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलेल्या चिंतेचं आम्ही स्वागत करतो. पण स्थापन केलेली चार सदस्यांची समिती धक्कादायक आहे. या चार सदस्यांनी यापूर्वीच कृषी कायद्यांच्या बाजूने भूमिका मांडलेली आहे. यामुळे ते शेतकर्यांना कोणता न्याय देतील, हा मोठा प्रश्न आहे, असं काँग्रेसने म्हटलंय.
सुप्रीम कोर्टाची समिती
सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्यांसंबंधी चार सदस्यांची समिती स्थापन केलीय. यात हरसिमरत मान, अशोक गुलाटी, डॉ. प्रमोद कुमार जोशी आणि अनिल घनवट यांचा समावेश आहे. या समितीने १० दिवसांच्या आत पहिली बैठक घ्यावी. तसंच २ महिन्यात आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times