या मांजामुळे अपघात होऊन दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असते. तसेच शाळकरी मुले देहभान विसरून पंतगाच्या मागे पळताना देखील अपघातग्रस्त होतात. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नायलॉनचा मांजा हा पर्यावरणासाठी हानिकारक असतो. लवकर तुटत नाही. तसेच त्याचा नाशही होत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नायलॉनचा मांजा तसेच काचेची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री, साठा आणि वापर यावर बंदी घातली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
याबाबतचे आदेश आयुक्तांनी बुधवारी मनाई आदेश जारी केले असून हा आदेश १४ जानेवारी ते ३१ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times