या घटनेनंतर विमानाची तपासणी करण्यात येत असल्याचं विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं. विमान बर्फाच्या ढिगाऱ्याला धडकल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होतं. पण विमानतळ अधिकाऱ्यांना त्यांना संपूर्ण माहिती दिली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढलं.
गेल्याच महिन्यात विमानाचा ताफ्यात समावेश
नवीन A321neo विमान व्हीटी-आययूझेडचा गेल्या महिन्यात विमानाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. इंडिगो फ्लाईट 6E 2559 बुधवारी दुपारी त्याच विमानाने दिल्लीहून निघाली होती. पण अपघातामुळे श्रीनगरमध्ये हे विमान थांबवावं लागलं.
श्रीनगरमधील तापमान उणे ७.८ अंशांपर्यंत घसरले
श्रीनगर तापमानात सातत्याने घट होत आहे. डोंगरांवर हिमवृष्टी सुरूच आहे. पारा उणे ७.८ अंशांपर्यंत खाली गेला आहे. यामुळे येथील डल लेक गोठला आहे. रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पालिका कर्मचारी सातत्याने रस्त्यांवरील बर्फ हटवत आहेत. हिमवृष्टी सुरूच आहे. पुढील दहा दिवस अशीच परिस्थिती कायम राहील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times