मुंबई: नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्तानं शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद घातली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिंमतीचं व जिद्दीचं स्वागत करावं. रद्द करून शेतकऱ्यांचं मन राखावं. तसं केल्यास मोदी आज आहेत, त्यापेक्षा मोठे होतील. मोदीजी, मोठे व्हा,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ( appeal PM )

शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून दिल्लीतील व सरकारच्या भूमिकेवर परखड भाष्य केलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालयास पुढं करून सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन संपवत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं मोदी सरकारवर केला आहे. ‘कृषी कायदे रद्दच करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. मात्र, सरकारनं न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलक शेतकऱ्यांवर बार उडवला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न होता. शेतकरी बांधवांनी तो उधळून लावला आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘एकदा सिंघू बॉर्डरवरील शेतकरी आपापल्या घरी परतला की, सरकार कृषी कायद्यावरची स्थगिती उठवून शेतकऱ्यांची नाकेबंदी करील. त्यामुळे ‘करो या मरो’च्या भूमिकेत शेतकरी संघटना आहेत. आतापर्यंत ६०-६५ शेतकऱ्यांनी आंदोलनात बलिदान दिले. इतके कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन स्वातंत्र्यानंतर भारतात झालं नव्हतं,’ असं म्हणत शिवसेनेनं आंदोलनाचं कौतुक केलं आहे.

‘सर्वोच्च न्यायालयानं कायद्यांना स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. यावरून शेतकऱ्यांवर टीका केली जाईल. शेतकरी सर्वोच्च न्यायालयासही जुमानत नाहीत, असा प्रचार केला जाईल. पण, प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या मानसन्मानाचा नसून देशाच्या शेतीविषयक धोरणाचा आहे. वातावरण जास्त बिघडू नये असे सरकारला वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. दुसऱ्यांचे खांदे भाड्यानं घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत,’ असा खोचक टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

‘शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांनी शिरकाव केला आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. आंदोलक सरकारचं ऐकत नाहीत म्हणून त्यांना देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवून काय साध्य होणार? चिनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आहेत. त्यांच्या माघारीसाठी चर्चा सुरू आहे, पण शेतकरी आंदोलकांना खलिस्तानवादी ठरवून बदनाम केले जाते. खलिस्तानवादी आंदोलनात घुसले असतील तर तेसुद्धा सरकारचेच अपयश आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here