नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष इटलीहून भारतात परतताच आज (गुरुवारी) तामिळनाडूच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान ते मदुराईच्या अवनियापुरममध्ये जलीकट्टी पाहण्याशिवाय उत्सवातही सहभाग घेणार आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेदेखील तामिळनाडूमध्ये उपस्थित असणार आहेत. नड्डा पोंगल उत्सवात सहभागी होणार आहेत. आगामी ची मोटबांधणी करण्यासाठी दोन्ही नेत्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. ()

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या खासदारांसोबत बोलताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीवरून राहुल गांधी आज तामिळनाडूला जाणार आहेत. सोबतच राज्यात काँग्रेसच्या आगामी विधानसभा निवडणूक तयारीचा आढावाही ते घेतील. पुढच्या काही महिन्यांत राहुल गांधी राज्यात पक्षाचा प्रचार करतानादेखील दिसणार आहेत.

वायनाडहून काँग्रेसचे खासदार असलेल राहुल गांधी आज मदुराईमध्ये उपस्थित राहतील. राहुल गांधी केवळ चार तासांसाठी शहरात असतील. अवनियापुरम जलीकट्टी आयोजन समितीकडून आठवडाभरापूर्वीच राहुल गांधींना यासाठी निमंत्रण धाडण्यात आलं होतं.

याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गुरुवारी तामिळनाडूचा दौरा करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकच्या दौऱ्यावर असतील. भाजपचे दोन्ही दिग्गज नेते सध्या दक्षिणेत पाय रोवण्याची रणनीती आखताना दिसत आहेत. तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेसोबत हातमिळवणी करत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. जे पी नड्डा आजच्या दौऱ्यात पोंगल उत्सवात सहभागी होतानाच पक्षाच्या तयारींचा आढावा घेणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here