एएनआयनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. मागील आठवड्यात एनसीबीच्या पथकानं खार परिसरातून तिघांना अटक केली होती. त्यात ब्रिटिश नागरिक करण सजनानी व अन्य दोघांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून मुच्छड पानवाला व मलिक यांचे जावई समीर खानं यांचं नाव पुढं आलं होतं. त्यानंतर एनसीबीनं खान यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. सखोल चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.
वाचा:
समीर खान यांना अटक केल्यानंतर काल रात्रीपासूनच एनसीबीच्या पथकांनी मुंबईत छापासत्र सुरू केलं आहे. आज सकाळी समीर खान यांच्या वांद्रे येथील घरी एनसीबीचे पथक पोहोचले असून शोधमोहीम सुरू आहे.
नवाब मलिक म्हणतात…
जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कुठल्याही पक्षपाताशिवाय कायद्यानं काम करायला हवं. कायदा त्याचं काम करेल आणि सत्य लवकर समोर येईल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times