‘ग्लोबल ब्रिटन, ग्लोबल ब्रोकर’ या नावाचा हा अहवाल आहे. ब्रिटनचे अंगीभूत सामर्थ्य मोठे आहे, पण सध्या जागतिक पटलावरील आपला प्रभाव घटणे ब्रिटन रोखू शकेल का, अशी शंका या अहवालात उपस्थित करण्यात आली आहे.
वाचा:
सध्या ब्रिटन परराष्ट्र धोरणाची नव्याने आखणी करीत आहे. जगातील १० प्रभावशाली देशांचा ‘डी-१०’ गट स्थापन करण्याची योजना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आखली आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या गटामध्ये भारताचा समावेश केल्यास एखाद्या धोरणावर सहमती होणे किंवा संयुक्त कृती करणे अवघड होईल, असा अभिप्रायही या गटाने व्यक्त केला आहे. ‘भारत, चीन, सौदी अरेबिया आणि तुर्कीहे देश अनाकलनीय आहेत,’ असे मत या गटाने नोंदवले आहे.
वाचा:
भारताबाबत प्रतिकूल मत का?
भारताबाबत प्रतिकूल मतासाठी थिंक टँकने काही मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. भारताची अंतर्गत धोरणे किचकट आणि विस्कळित असल्याने मुक्त व्यापार आणि परकी गुंतवणुकीला विरोध होतो. त्याशिवाय पंडित नेहरूंच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही धोरणांशी फारकत घेऊन भारतीय जनता पक्षाने अंगीकारलेल्या हिंदुत्वाच्या धोरणामुळे अल्पसंख्याकांच्या हक्कांचा संकोच होत असल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
वाचा:
पाश्चिमात्य देशांची पूर्ण बाजू घेण्यास भारत खळखळ करतो असा इतिहास आहे. पूर्वी भारताने अलिप्त राष्ट्र संघटनेचे नेतृत्व केले. आता २०१७मध्ये भारत चीन आणि रशिया यांच्या नेतृत्वाखालील शांघाय सहकार्य संघटनेत सहभागी आहे. त्याशिवाय भारत हा ब्रिटनपेक्षा भारत अमेरिकेला अधिक प्राधान्य देत असल्याचे थिंक टँकने म्हटले. चीनशी सीमावाद असूनही २०१९मध्ये संयुक्त राष्ट्रांत चीनविरोधी ठरावाला भारताकडून पाठिंबा देण्यात आला नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. चीनकडून हाँगकाँगमध्ये होत असलेल्या लोकशाहीच्या गळचेपीबद्दलही भारताने उघड भूमिका घेतली नाही, असेही या अहवालात नमूद करण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times