अहमदनगर: करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अपघात तसेच इतर गंभीर गुन्हे कमी झाल्याचे आढळून आले. असे असले तरी नगर जिल्ह्यात उलटे चित्र आहे. अन्य गुन्हे कमी झाले असले तरी करोनासंबंधीचे नियम मोडल्याचे तब्बल २६ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण गुन्ह्यांच्या संख्येच चौपटीने वाढ झाली आहे. करोनाचे आकडे कमी होत असल्याने त्यासंबंधीचा पोलिसांवरील ताण कमी होत असला तरी दाखल २६ हजार गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे काम आता पोलिसांना लागले आहे. ( during Lockdown)

वाचा:

गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या टप्प्यात लॉकडाउन करण्यात आला होता. कडक लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावरील वावर कमी झाल्याने अपघात, खून, दरोडे, जबरी चोऱ्या, घरफोड्या असे गुन्हे कमालीचे घटले होते. करोनासंबंधी करण्यात आलेले नियम मोडल्याचे गुन्हे पोलिसांकडून दाखल केले जात होते. लॉकडाउनमध्ये शिथीलता दिल्यावर त्यात आणखी वाढ झाली. नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २६ हजार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यात ही संख्या सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येते. मास्कचा वापर न करणे, सोशल डिन्स्टन्स न पाळणाऱ्या, संचारबंदी असताना बाहेर फिरणे, बनावट पासद्वारे फिरणे, दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती, चार चाकीमध्ये तीनच व्यक्ती, दुकान वेळेआधी न उघडणे, वेळ संपली तरी सुरू न ठेवणे असे विविध नियम केले गेले होते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, दुकानदार-व्यावसायिक, संस्थांशी संबंधितांवर मुंबई पोलिस अॅक्ट १८८नुसार विविध पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल करण्यात आले. दुचाकी व चारचाकी वाहनेही जप्त केली गेली गेली. अशा प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करणारांविरुद्ध हे २६ हजार ७०० गुन्हे दाखल आहेत. आता या प्रत्येक गुन्ह्याचे स्वतंत्र दोषारोपपत्र तयार करून ते न्यायालयात पाठवावे लागणार आहे. यामुळे २०१९ वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांची संख्या सुमारे चौपट झाली. २०१९ मध्य़े जिल्ह्यात सर्वप्रकारचे एकूण गुन्हे ११ हजार १९५ दाखल होते. आता २०२० मध्ये ४३ हजार ७९७ गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांपैकी ६९ टक्के गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हे उघ़डकीस येण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे.

वाचा:

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता करोनाकाळातील गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आरोपींचा शोध घेणे, कागदपत्रांची जुळवाजुळव करणे नावांचे खात्री करणे अशी कामे करावी लागत आहेत. यातीस काही आरोपी बाहेरच्या राज्यांतील आहेत, त्यांचा शोध जिकरीचा झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here