मुंबई: राज्याचेसामाजिक न्यायमंत्री यांच्यावर एका महिलेनं केलेले बलात्काराचे आरोप व त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणावर शिवसेनेचे खासदार यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप राजकीय नाहीत. वैयक्तिक आहेत. त्यातून ते मार्ग काढतील. राष्ट्रवादी काँग्रेसही यावर निर्णय घेण्यास सक्षम आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे. ( on )

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरलं आहे. मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेची भूमिका मांडली.

वाचा:

‘काही गोष्टी खासगी असतात. मुंडे यांच्यावरील आरोपांचंही तसंच आहे. तो प्रश्न त्यांच्यावरच सोडायला हवा. त्यात राजकारण आणणं योग्य नाही. राजकीय विषयावर आरोप-प्रत्यारोप करणं ठीक आहे. पण कौटुंबिक विषयात कुणीही राजकारण करू नये. कोणत्याही व्यक्तीला राजकारणात शिखरावर पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. त्यामुळं चिखलफेक करून कुणी एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करणं योग्य नाही. सर्व राजकारण्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून आम्ही या गोष्ट शिकलो आहोत,’ असं राऊत म्हणाले.

वाचा:

‘मुंडे यांच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल करून का घेतली नाही, यावर मला काहीही बोलता येणार नाही. मात्र, या विषयाचं भांडवल केल्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे,’ असंही राऊत यांनी सुनावलं.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचीही संजय राऊत यांनी यावेळी आठवण करून दिली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांची पाठराखण केली होती, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.

शेतकरी न्यायालयात गेले नाहीत!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. ‘शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडं कुठलीही मागणी केलेली नाही. त्यांनी सरकारकडं मागणी केली आहे. कायदे न्यायालयानं नव्हे तर सरकारनं तयार केले आहेत. त्यामुळं सरकारनं एक पाऊल पुढं टाकावं. तसं केल्यानं आभाळ कोसळणार नाही,’ असंही ते म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

 1. Hey there,

  Want to boost your sales by 150% with chatbots?
  Chatbots are automated conversations that engage your visitors and guide them to buy from you.
  They can help you:

  – Capture attention and build trust
  – Increase customer satisfaction and loyalty
  – Reduce bounce rate and cart abandonment
  – Grow your email list and social media following
  And you don’t need any coding skills or technical knowledge to create chatbots for your website.

  Our bot is a simple and smart solution that lets you design and customize chatbots for any website platform.
  And you can try it for free today. No credit card required.

  Just click here: https://ai-global.online/ChipBot

  Don’t miss this chance to level up your website.

  Your friend,
  Stacey Trevino, Marketing Manager @AI Global

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here