मधुबनी, : बिहारमधील जिल्ह्यातून अतिशय क्रूर अशी घटना समोर येतेय. एका अल्पवयीन मुलीवर केल्यानंतर हैवानांनी या मुलीचे डोळे फोडल्याचं समोर आलंय. ( on in district, Bihar)

मधुबनी जिल्ह्याती हरलाखी पोलीस स्टेशन अंतर्गत कौवाहा बरही नावाच्या गावात ही घटना घडलीय. अवघ्या १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. परंतु, इथेच न थांबता आरोपींनी मुलीचे . पीडित तरुणीला आपली ओळख पटवता येऊ नये, यासाठी आरोपींनी हे भयंकर कृत्य केलं.

पोलीस अधीक्षक सत्य प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण समोर आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक करण्यात आलीय.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित काही मुलांसोबत गावाच्या वेशीवर बकरी चरण्यासाठी घेऊन गेली होती. त्यानंतर, शेजारील मनोहरपूर गावातील एका चौकात मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली. एका मुलानं ही माहिती पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना दिली.

कुटुंबीयांनी तत्काळ मुलीला घेऊन जवळच्या उमगाव आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. डॉक्टरांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मुलीला मधुबनी सदर रुग्णालयाकडे नेण्याचा सल्ला दिला.

पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या मुलीचे कपडे फाटलेले होते. तसंच तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत होता.

आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीचा एक डोळा पूर्णपणे निकामी झालेला आहे. तर दुसरा डोळाही जबर जखमी झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here