मुंबई- आणि ११ जानेवारीला पालक झाले. अजूनही जगभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. जवळच्या मित्र- परिवारानेही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या बी- टाउनमध्ये अनुष्काच्या मुलीचीच चर्चा होत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काहींनी मुलीचं नाव काय असावं हे सुचवलं तर काहींनी मुलीची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. आता मेगा स्टार यांनीही विराटच्या मुलीचा क्रिकेट संघाशी मजेशीर संबंध जोडला आहे.

लिहिले- धोनीची मुलगी कर्णधार होणार का?
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटूंच्या मुलींची एक यादीच शेअर केली. यात अशा क्रिकेटपटूंची यादी आहे ज्यांना मुली आहेत. बिग बी यांनी लिहिले की, ‘…आणि धोनीलाही एक मुलगी आहे… ती कर्णधार होईल का? अमिताभ यांनी एका युझरचा हा मेसेज शेअर केला. यात भारतीय क्रिकेटपटूंना असणाऱ्या मुलींची यादी शेअर करत भविष्यातला भारतीय क्रिकेट संघ असा मेसेजही लिहिला आहे..

मुलीला प्रायव्हसी मिळावी अशी अनुष्का- विराटची इच्छा

विराट- अनुष्काला मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवायचं आहे. यासाठीच त्यांनी मीडियाला अधिकृत पत्र लिहून मुलीचे फोटो काढले जाऊ नये याबद्दल सांगितलं आहे. विराटने अनुष्काच्या सुरक्षेमध्येही वाढ केली आहे. तसेच त्यांना योग्य ती प्रायव्हसी देण्यात यावी अशी विराटने सोशल मीडियावर विनंतीही केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here